नवी दिल्ली - काँग्रेस नेते शशी थरुर यांनी देशात झुंडबळीच्या वाढत्या घटनांवरुन पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताममध्ये आता सहिष्णुतेला जागा राहिली नाही. देशात राजकारणाचे ध्रुवीकरण झाले आहे. यासाठी सत्ताधारी जबाबदार असल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
सहा वर्षांपूर्वी पुण्यामध्ये मोहसिन खान या युवकाच्या हत्येने देशात झुंडशाहीला सुरुवात झाली. त्यानंतर गोमांस असल्याच्या आरोपावरुन मोहम्मद अखलाखची हत्या करण्यात आली. मात्र, त्याच्याकडे तर गोमांसही नव्हते, तरीही त्याला जमावाने ठार मारले. जरी अखलाखकडे गोमांस असते तरी त्याला मारण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल त्यांनी विचारला.