महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 : देशात एका दिवसातील सर्वाधिक नोंद; २४ तासांत वाढले सुमारे पंधराशे रुग्ण - India Corona cases

देशातील एकूण रुग्णांपैकी ९,२७२ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर, १,१९० जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये देशात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या बळींची संख्या ३५३ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

sharpest-one-day-raise-in-covid-19-patirents-with-1463-new-cases-reported-in-last-24-hours
COVID-19 : देशात एका दिवसातील सर्वाधिक नोंद; २४ तासांत वाढले सुमारे पंधराशे रुग्ण..

By

Published : Apr 14, 2020, 6:17 PM IST

नवी दिल्ली- देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. काल देशात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासांमध्ये देशात १,४६३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या १०,८१५ वर पोहोचली आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील एकूण रुग्णांपैकी ९,२७२ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर, १,१९० जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये देशात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या बळींची संख्या ३५३ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रात सर्वाधिक (२,३३४) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (१,५१०) आणि तामिळनाडूचा (१,१७३) क्रमांक लागतो. तर, महाराष्ट्रामध्ये बळींची संख्याही सर्वाधिक (१६०) आहे. त्यापाठोपाठ, मध्यप्रदेश (५०) आणि गुजरातचा (२८) क्रमांक लागतो.

हेही वाचा :सोमवारपर्यंत देशात 2 लाख 31 हजार जणांची कोरोना चाचणी - आयसीएमआर

ABOUT THE AUTHOR

...view details