महाराष्ट्र

maharashtra

COVID-19 : देशात एका दिवसातील सर्वाधिक नोंद; २४ तासांत वाढले हजारहून अधिक रुग्ण..

By

Published : Apr 11, 2020, 9:58 AM IST

गेल्या २४ तासांमध्ये देशात १,०३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७,४४७ वर पोहोचली आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

Sharpest one day raise in COVID-19 patirents with 1035 new cases reported in last 24 hours
COVID-19 : देशात एका दिवसातील सर्वाधिक नोंद; २४ तासांत वाढले हजारहून अधिक रुग्ण..

नवी दिल्ली- देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. काल देशात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासांमध्ये देशात १,०३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७,४४७ वर पोहोचली आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

यातील ६,५६५ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर, ६४२ जण पूर्णत: बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या बळींची संख्या २३९ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,५७४ वर पोहोचला आहे. तामिळनाडूमध्ये ९११ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, दिल्लीमध्येमध्ये ९०३ रुग्ण आढळले आहेत. तसेच, महाराष्ट्रामध्ये सर्वांत जास्त रुग्ण कोरोनामुळे मरण पावले आहेत. महाराष्ट्रामध्ये ११०, मध्य प्रदेशमध्ये ३३, तर गुजरातमध्ये १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :पंतप्रधान मोदी आज साधणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

ABOUT THE AUTHOR

...view details