नवी दिल्ली -महाराष्ट्रातील सत्तेचा पेच हा अधिकाधिक गुंतत चालला आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये ४५ मिनिटे चर्चा सुरू होती. बैठकीनंतर शरद पवार यांनी टि्वट करून दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितले आहे.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पवारांनी केले टि्वट, म्हणाले...'शेतकऱ्यांच्या समस्यांवर मोदींशी केली चर्चा' - शरद पवार यांनी केली मोदींची चर्चा
आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये ४५ मिनिटे चर्चा सुरू होती.
आज संसदेत मोदींची भेट घेतली. या भेटीत कुठल्याच प्रकारची राजकीय विषयावर चर्चा झाली नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर मोदींशी चर्चा केली. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील 325 तालुक्यामधील पिकांचे नुकसान झाले आहे, असे पवार यांनी टि्वटमध्ये म्हटले. शरद पवार यांनी मोदींना एक पत्र दिले आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत. याचबरोबर त्यांनी मोदींना पुण्यातील साखर परिषदेला येण्याचे निमंत्रणही दिले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय कोंडी सुटत नसून शरद पवारांच्या उलट-सुलट वक्तव्यांनी अधिक संभ्रम निर्माण होत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी युती होण्याची चिन्हे दिसत असतानाच, शरद पवारांनी सत्तास्थापनाबाबत शिवसेना-भाजपला विचारा असे म्हणत सर्वांनाच कोड्यात पाडले होते. तर दुसरीकडे, नरेंद्र मोदींनी राज्यसभेच्या २५०व्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे कौतुक केल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते.