नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसुचना न देता ही सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. २० जानेवारीपासून ही सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे.
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा हटवली, राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसुचना न देता ही सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
६ जनपथ हे शरद पवारांचे दिल्लीतील निवासस्थान आहे. या निवासाची सुरक्षा २० जानेवारीपासून हटवण्यात आली असल्याची माहिती शरद पवार यांच्या दिल्लीतील कार्यालयातून देण्यात आली आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाडांनी भाजपवर जोरदार निशाणा लगावला आहे. शरद पवार हे सह्याद्रीचा पहाड असून, सुरक्षा काढल्याने ते घाबरणार नाहीत. लोकांचे प्रेम हीच त्यांची सुरक्षा असल्याचे म्हटले आहे. तर राज्यातील सत्तापरिवर्तन हे भाजपच्या जिव्हारी लागल्याने भाजप सुडबुद्धीने वागत असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे प्वक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही भाजपवर टीका केली आहे.
राज्यात शरद पवार यांना 'Z' SECURITY आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानेच दिल्लीतील निवासाची सुरक्षा हटवल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. काही दिवसापूर्वी क्रिकेटर सचिन तेंडूलकरच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली होती. तसेच माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
TAGGED:
राष्ट्रवादी आक्रमक