महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शरद पवार- सोनिया गांधी यांची बैठक संपन्न; काय ठरले याबाबत उत्सुकता - शरद पवार सोनिया गांधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते. त्यांदरम्यान महाराष्ट्रातील पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा झाली. तसेच, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sharad Pawar and Sonia gandhi

By

Published : Nov 18, 2019, 5:26 PM IST

Updated : Nov 18, 2019, 5:59 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्मादरम्यान सुरु असलेली बैठक संपन्न झाली आहे. महाराष्ट्रातील राजकारणासंबंधी पुढील वाटचाल ठरवण्याबाबत यामध्ये चर्चा झाली. आधी ठरल्याप्रमाणे ही बैठक काल (रविवार) होणार होती. मात्र, ऐनवेळी या बैठकीची वेळ पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार आता आज ही बैठक पार पडली. साधारणपणे ५० मिनिटे ही बैठक सुरु होती.

राष्ट्रपती राजवटीनंतर सेना-भाजपची युती संपुष्टात आली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाशिवआघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी पवार आणि गांधी यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर मंगळवारी महाशिवआघाडीबाबात निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र सेनेला दिले नाही. त्यामुळे सेनेनंतर राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र, सेनेसह राष्ट्रवादीही बहुमत सिद्ध करू शकली नाही. आज होणाऱ्या पवार आणि गांधी भेटीनंतर राज्याच्या राजकाणाला कोणते वळण मिळेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीवर स्तुतीसुमने..

Last Updated : Nov 18, 2019, 5:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details