अजमेर- राजस्थानातील अजमेर येथे २९ तारखेपासून ख्वाजा गरीब नवाज यांचा ऊरूस सुरू होत आहे. याच निमित्ताने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावतीने अजमेर येथील दर्ग्यावर चादर चढवण्यात आली. जयंत पाटील, नवाब मलिक, फमीदा खान, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सोहेल सुभेदार, हसन खान आणि जमाल शेख चादर घेऊन दर्ग्यात पोहोचले.
शरद पवारांकडून अजमेरच्या ‘ख्वाजा गरीब नवाज’ यांच्या दर्ग्याला चादर - अजमेरच्या ‘ख्वाजा गरीब नवाज’ यांच्या दर्ग्याला चादर
निमित्ताने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावतीने अजमेर येथील दर्ग्यावर चादर चढवण्यात आली. जयंत पाटील, नवाब मलिक, फमीदा खान, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सोहेल सुभेदार, हसन खान आणि जमाल शेख चादर घेऊन दर्ग्यात पोहोचले.
शरद पवारांकडून अजमेरच्या ‘ख्वाजा गरीब नवाज’ यांच्या दर्ग्याला चादर
यावेळी सर्वांनी देशात आणि राज्यात शांततापूर्ण वातावरण राहावे, अशी प्रार्थना केली. यावेळी आचार्य पंडित विमल पारीक यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना ख्वाजा गरीब नवाज आणि पुष्कर सरोवर यांचे महत्त्व सांगितले. यासोबतच राजस्थानातील राजकीय घडामोडींबद्दल चर्चाही केली.