पालमपूर -हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. या पत्राद्वारे त्यांनी दलाई लामा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची आणि तिबेट विषय संयुक्त राष्ट्रात उपस्थित करण्याची मागणी केली आहे. या वेळेच्या अत्यंत अनुकूल आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारताने शक्य तितक्या लवकर या दोन गोष्टी केल्या पाहिजेत, असे शांता कुमार यांनी पत्रात म्हटले आहे.
दलाई लामा प्रतिष्ठित आध्यात्मिक नेते
दलाई लामांचा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करा आणि तिबेटचा विषय संयुक्त राष्ट्रात उपस्थित करा. दलाई लामा यांना जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्कार मिळाला आहे. इतरही अनेक देशांकडून त्याला सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी, दलाई लामा हे जगातील सर्वात प्रतिष्ठित आध्यात्मिक नेते आहेत. त्यांचा सन्मान केल्यास भारताचाही सन्मान होईल, असे शांता कुमार यांनी पत्रात लिहले आहे.
तिबेट हत्याकांड -
तिबेट हत्याकांड हे 21 व्या शतकातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. 1950 मध्ये चीन सरकारला तिबेट ताब्यात घेण्यास परवानगी देऊन, काँग्रेसने पाप केले होते. त्यावेळी जगातील अमेरिकेसारख्या मोठ्या देशांना भारताने तिबेट प्रश्न लीग ऑफ नेशन्समध्ये उपस्थित करावा, अशी अपेक्षा होती. त्यावेळी तिबेटला भक्कम पाठिंबा दिला असता. तर भारताच्या आणि चीनच्या सीमा लगत नसत्या, असेही ते म्हणाले.
संपूर्ण जगात चीन एकटा -
चीन संपूर्ण जगासाठी एक संकट बनत आहे. लडाखमध्ये घुसखोरी करत आहे. शांतता प्रस्थापीत करण्याच्या चर्चांना यश मिळत नसून जनरल बिपीन रावत यांनीही युद्धाची भीती व्यक्त केली आहे. चीनचा सर्वात मोठा धोका भारताला आहे. आज संपूर्ण जगात चीन एकटा पडला आहे. अमेरिकेसारख्या बड्या देशही चीनला संकट समजतात, असे ते म्हणाले. 1950 मध्ये झालेली भयानक चुक सुधारण्यासाठी आज एक सुवर्ण संधी मिळाली आहे. भारताने ही दोन पावले उचल्यास जगातील एकटा पडलेला चीन पूर्णपणे बेनकाब होईल, असे शांता कुमार म्हणाले.
चीनचे 1950 साली तिबेटवर आक्रमण -
विस्तारवादी मानसिकता ठेवणाऱ्या चीनने 1950 साली तिबेटवर आक्रमण करुन तिबेटचा भूभाग बळकावला. आजही सर्वसामान्य तिबेटी जनतेच्या मनात चीनबद्दल प्रचंड राग आणि संतापाची भावना आहे. जगाच्या वेगवेगळया भागात तिबेटी नागरिक चीनच्या या दडपशाही विरोधात शक्य त्या मार्गाने आवाज उठवत असतात. तिबेटच्या कायदेशीर हक्काबाबत तिबेट आणि चीन यांच्यामध्ये वाद आहे.