महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश : नाईट कर्फ्यूमधली पार्टी भोवली, 13 जणांविरोधात गुन्हा दाखल - उत्तर प्रदेश कोरोना अपडेट

शामली शहरात मोठ्या आवाजात दुकानामध्ये पार्टी दरम्यान गोंधळ सुरू होता. स्थानिक नागरिकांच्या विनंतीनंतरही डीजेचा आवाज कमी केला नाही. त्यामुळे स्थानिकांनी पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली. साथीचा आजार कायद्याखाली नियमभंग केल्याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

पार्टी करणाऱ्यांना अटक
पार्टी करणाऱ्यांना अटक

By

Published : Aug 6, 2020, 4:59 PM IST

लखनऊ -उत्तर प्रदेशात शामली जिल्ह्यात नाईट कर्फ्यू दरम्यान पार्टी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये आठ महिलांचा समावेश आहे. शहरात नाईट कर्फ्यू सुरू असताना एका दुकानात वाढदिवसाची पार्टी सुरू होती.

पार्टी आयोजकांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही नियम पार्टीत पाळण्यात येत नव्हते, असे पोलिसांमधील सूत्रांनी म्हटले आहे. मोठ्या आवाजात दुकानामध्ये पार्टी दरम्यान गोंधळ सुरू होता. स्थानिक नागरिकांच्या विनंतीनंतरही डीजेचा आवाज कमी केला नाही. त्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना पार्टी सुरू असल्याची माहिती दिली. साथीचा आजार कायद्याखाली नियमभंग केल्याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. एक 42 वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुलांचाही अटक केलेल्यामध्ये समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘पार्टीची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पथकात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. घटनास्थळावरून 13 जणांना विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याचे शामली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितले’.

ABOUT THE AUTHOR

...view details