महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचारातील शाहरुखचा थाट..! ४ गर्लफ्रेंड.. शाही पार्ट्या अन् जिमचे फॅड

24 फेब्रुवारीला शाहरुख आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला निघाला होता. त्यातच त्याला दंगलीची माहिती मिळाली. त्याला संताप अनावर झाला. तो बंदूक घेऊन तेथे गेला आणि गोळीबार केला. त्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

शाहरुखची इनसाइड स्टोरी
शाहरुखची इनसाइड स्टोरी

By

Published : Mar 5, 2020, 11:32 AM IST

Updated : Mar 5, 2020, 1:21 PM IST

नवी दिल्ली- दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या वेळी शाहरुख या तरुणाने गोळीबार केला होता. मात्र, तो सराईत गुन्हेगार नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शाहरुखचा सीएएला तीव्र विरोध आहे. सीएएविरुधात होणाऱ्या आंदोलनात तो सहभागी होत असे. दिल्लीत झालेल्या दंगलीतही तो असाच सहभागी झाला मात्र, यात त्याने गोळीबार केला.

शाहरुखची इनसाइड स्टोरी...

निघाला होता गर्लफ्रेंडला भेटायला...

24 फेब्रुवारीला तो आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला निघाला होता. त्यातच त्याला दंगलीची माहिती मिळाली. त्याला संताप अनावर झाला. तो बंदूक घेऊन तेथे गेला आणि गोळीबार केला. त्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

बनवायचा टिकटा‌ॅवर व्हिडिओ...

तो नियमित जिमला जायचा. टिकटा‌ॅवर व्हिडिओ बनवायचा. महागड्या हाॅटेलमध्ये पार्टी करायचा. एक दोन नाही तर त्याच्या चार गर्लफ्रेंड आहेत. अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.

पोलिसाला धक्काबुक्कीची कबुली...

दंगलीच्या वेळी हातात बंदूक घेतलेल्या शाहरुखला आडवायला पोलीस समोर आले. मात्र, शाहरुख त्यांना म्हणाला की, माझी तुमच्याशी दुश्मनी नाही. तुम्ही माझा रस्ता अडवू नका. गोळीबारानंतर हिंसाचार वाढू लागल्यानंतर शाहरुख घरी परतला. टिव्हीवर त्याने त्याचा व्हिडिओ पाहिला. त्यानंर तो काकाच्या घरी गेला. तिथून काही पैसे घेऊन फरार झाला.

शाहरुख

असा झाला शाहरुख फरार...

24 च्या रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने एका पार्किंगमध्ये रात्र घालविली. 25 तारखेच्या सकाळी तो जालंधरला निघाला. मात्र, ज्याच्याकडे त्याला जायचे होते. त्या परिचयाच्या व्यक्तीला सर्व प्रकार समजला होता. त्यामुळे त्या व्यक्तीने शारुखला आश्रय देण्यास नकार दिला. त्यामुळे शाहरुख तेथून बरेलीला गेला. तेथून शामलीमध्ये एका नातेवाईकांकडे थांबला. त्याठिकाणी तो दिवसा बसमध्ये बाहेरच फिरायचा आणि रात्री नातेवाईकांकडे जायचा.

शामलीत घेतला नवीन मोबाईल...

शामलीत पोहोचल्यावर शारुखने एक नवा मोबाईल खरेदी केला. त्याच्याजवळ अगोदर पासूनच एक सिमकार्ड होते. त्याचा वापर त्याने त्या नवीन मोबाईमध्ये केला. त्याने सोबत आणलेली त्याची गाडी शामलीतच लपवून ठेवली होती.

ती बंदूक ठेवली दिल्लीतच लपवून...

दंगलीच्या वेळी वापरलेली बंदूक फेकून दिल्याचे शारुखने पोलिसांना सांगितले होते. मात्र, नंतर झालेल्या कसून चौकशीत ती बंदूक दिल्लीतच लपवून ठेवली असल्याची माहिती त्याने दिली. त्याने ती 10 हजारांना खरेदी केली होती.

Last Updated : Mar 5, 2020, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details