नवी दिल्ली - शाहीन बागेतील सीएए आंदोलनाविरोधात हिंदू सेनेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुडी यांनी हिंदू सेनेला मोर्चा न काढण्याचे आवाहन केले आहे. कायदेशीर रित्या येत्या 7 दिवसांमध्ये शाहीन बाग खाली करून रस्ता मोकळा करण्यात येईल, असे रमेश बिधुडी म्हणाले.
रमेश बिधूडी यांनी शाहीन बागविरोधी मोर्चामध्ये लोकांना न जाण्याचे आवाहन केले आहे. रस्ता जाम झाल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, त्याविरोधामध्ये मोर्चा काढण्याची गरज नाही. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांतता कायम ठेवणे गरजेचे आहे. सरकारकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येईल आणि येत्या 7 दिवसांच्या आतमध्ये आम्ही कायदेशीर रित्या शाहीन बाग खाली करू, असे रमेश बिधुडी म्हणाले.