महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जनता कर्फ्यू : 22 मार्चलाही सुरुच राहणार शाहीन बागेतील महिलांचे आंदोलन - SHAHEEN BAGH PROTESTS TO CONTINUE ON JANTA CURFEW

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शाहीन बागेमध्ये 22 मार्चला देखील आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती आहे.

SHAHEEN BAGH PROTESTS TO CONTINUE ON JANTA CURFEW
SHAHEEN BAGH PROTESTS TO CONTINUE ON JANTA CURFEW

By

Published : Mar 20, 2020, 11:45 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. भारतामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 230 पेक्षा अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शाहीन बागेमध्ये 22 मार्चला देखील आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती आहे.

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवरही शाहीन बागेतील महिलांचे आंदोनल सुरुच राहणार आहे. 22 मार्चला महिला एकमेंकापासून 1 मिटरच्या आंतरावर बसणार आहेत. 'आम्ही खबरदारी बाळगत आहोत. कोरोनामुळे आम्ही स्वच्छता पाळत आहोत. दिवसातून 5 वेळेस हात धुणे हे आमच्या जीवनशैलीचा भाग असल्याचे एका महिला आंदोलकानी सांगितले. दरम्यान कोरोनाचा प्रभाव पाहता दिल्ली सरकाराने शहरामध्ये 20 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंधन घातले आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे काही दिवसांपासून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. सुमारे दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या महिलांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन संवादकांची नेमणूक केली आहे. दरम्यान महिलांचे आंदोलन सुरुच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details