नवी दिल्ली - दिल्लीतील शाहीन बाग परिसरात तब्बल 100 दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायदा, एनपीआर, आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरू होते. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता 21 दिवसांची देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्यांना तेथून हटवले आहे.
आम्हाला बळजबरीनं उठवण्यात आलं, शाहीन बाग आंदोलकांच सर्वोच्च न्यायालयाला पत्र - forcible removal of shaheen bagh protest
आंदोलक शाहीन बाग परिसर सोडण्यास तयार नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत तेथून हटविले. यावेळी आंदोलकांनी उभे केलेले तंबू आणि इतर साहित्यही तेथून काढण्यात आले आहे.
आंदोलक शाहीन बाग परिसर सोडण्यास तयार नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत तेथून हटविले. यावेळी आंदोलकांनी उभे केलेले तंबू आणि इतर साहित्यही तेथून काढण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलकांनी आता सर्वोच्च न्यायालयाला याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. आम्हाला शाहीन बाग परिसरातून बळजबरीनं हटविण्यात आले. आदोलंन स्थळाला पोलिसांनी उद्ध्वस्थ केले, असे पत्रामध्ये म्हटले आहे.
मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 11 डिसेंबरला नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत मंजूर झाल्यानंतर 14 तारखेपासून शाहीन बागेत आंदोलन सुरू आहे. त्यामुळे दिल्लीतील महत्त्वाच्या भागांना जोडणारे रस्तेही बंद झाले होते. शाहीन बांग आंदोलनावरून राजधानी दिल्लीत जातीय दंगलीही झाल्या. यामध्ये 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, आता कोरोनाच्या धोक्यामुळे शाहीन बाग आंदोलन संपुष्टात आले आहे.