महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना इफेक्ट : रुग्णालयाचा निष्काळजीपणा उठला गर्भवती महिलेच्या जीवावर - delhi corona new updates

शाहदरामध्ये राहणाऱ्या मोनिका या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ती त्यावेळेस ८ महिन्यांची गर्भार होती. कोरोना झाल्यानंतर तिच्यावर योग्य उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिचा पती राजीव याने केला आहे.

इलाज के अभाव
इलाज के अभाव

By

Published : Jun 10, 2020, 7:41 PM IST

दिल्ली (शाहदरा) - दिल्लीच्या शाहदरामध्ये राहणाऱ्या मोनिका या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ती त्यावेळेस ८ महिन्यांची गर्भार होती. कोरोना झाल्यानंतर तिच्यावर योग्य उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिचा पती राजीव याने केला आहे.

राजीव आणि त्याच्या कुटुंबियांसह दिल्लीच्या शाहदरा येथे राहतो. राजीवची पत्नी मोनिका ही ८ महिन्यांची गर्भवती होती तिच्यावर गाजियाबादच्या यशोदा रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार २९ मे रोजी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा पॉझिटिव्ह अहवाल ३० मे ला प्राप्त झाला. यावेळी रुग्णालयातील स्टाफने आमच्याकडे कोरोनावर उपचार होत नाही, असे कारण सांगून मोनिकाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर, आपण दिल्ली शासनाने दिलेल्या यादीत असलेल्या रुग्णालयाच्या क्रमांकावर संपर्क करणे सुरू केले असे राजेशने सांगितले.

मी रात्री १ वाजेपर्यंत फोन लावत राहिलो, मात्र, सर्वच रुग्णालयांनी मोनिकाला दाखल करुन घेण्यास नकार दिला. तर, काही रुग्णालयात आमच्याकडे खाटा उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले, असल्याचे राजेशनी सांगितले. काहीच मार्ग निघत नसल्याने, ३० मे ला रात्री १ वाजता राजेश पत्नी मोनिकाला घेऊन लहान भावाबरोबर घेऊन गुरू तेग बहादुर रुग्णालयात गेला. तिथे गेल्यानंतर कोरोनाच्या चाचणीकरता नमुने देण्यासंबंधी सांगण्यात आले. यावेळी, ते सॅम्पल देण्यास दुसऱ्या वार्डमध्ये गेले असता त्यांना, आधीच तीन दिवसांचे नमुने पेंडिंग असल्याचे कळले. तर, सॅम्पल ठेवण्याकरता जागाही शिल्लक नसल्याचे त्यांना सांगणअयात आले. राजीवने त्यांना हे सर्व लिखीतमध्ये देण्यास सांगितले, जेणेकरून डॉक्टर ते वाचून मोनिकाला दाखल करून घेतील. त्यानुसार लिखीत कागद घेऊन जेव्हा ते परत वार्डमध्ये पोहोचले त्यावेळेस डॉक्टरांनी रुग्णाला दाखल करून घेण्याऐवजी जागा शिल्लक नसल्याचे कारण सांगत एलएनजेपी नामक रुग्णालयात दाखल करून घेण्यास सांगितले.

तर, अशाच प्रकारे विविध रुग्णालयांमध्ये अनेक कारणे सांगत तिला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. ३१ मे ला सकाळी ९ वाजता मॅक्स रुग्णालयात १ खाट शिल्लक असून तेथे नेण्यात यावे असे सांगण्यात आले. त्यानुसार, राजीव पत्नीला घेऊन तिथे पोहोचला. तेथील वैद्यकीय चमूने सर्व माहिती घेतली. राजीवने मोनिका ८ महिन्यांची गर्भवती असून तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगितले. तसेच, हिमोग्लोबिनही कमी असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर एका वरिष्ट डॉक्टरांनी तिला दाखल करून घेण्यास नकार देत, खाट उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले.

त्यानंतर, राजीव पत्नीला घेऊन एलएनजीपी रुग्णलयात गेला. तिथे तिला कॉमन वार्डमध्ये दाखल करून घेण्यात आले. मात्र, त्यानंतर २४ तास तिच्यावर कुठलाच उपचार करण्यात आला नाही. याबाबत डॉक्टरांना कळवण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी वेगवेगळे कारण दिले. तर, कॉमन वार्ड अस्वच्छ असल्यामुळे राजीवने मोनिकाला एका खासगी रुग्णालयात १० हजार रुपये जमा करुन तिथे खाट उपलब्ध असल्यास सांगण्याची विनंती केली.

दरम्यान, १ जूनरोजी मोनिकाची तब्येत जास्त बिघडली. तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर, तिच्या तब्येतीत थोडा सुधार जाणवला. दरम्यान, त्या रात्री मोनिकाने राजीवला फोन करून खूप तहान लागली असून कुणीच पाणी द्यायला तयार नसल्याचे सांगितले. यानंतर राजीवने रुग्णालयात फोन करून याबाबत सांगितले. मात्र, कोणीच ऐकलं नाही. त्यानंतर, राजीव स्वत: रुग्णालयात पोहोचला आणि तेथील इन्चार्जला याबाबत माहिती दिली. मात्र, त्यांनी आत जाण्यास राजीवला नकार दिला. त्यानंतर, ३ जूनचा दिवसही असाच निघून गेला. तर, ४ जूनरोजी डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन दिले. यानंतर ती बरी वाटत असल्याचे व्हिडिओ कॉलवरून कळले असल्याचे राजीवने सांगितले.

मात्र, रात्री ३ वाजता राजीवला फोन आला कि तुमच्या पत्नीची तब्येत खूप खराब झाली असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले. यानंतर, ४ वाजता राजीव रुग्णालयात पोहोचला असता तिची प्रकृती गंभीर असल्याचे त्याला कळले. तर, सकाळी ८ वाजता मोनिकाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय टिमने सांगितले. राजीवने मोनिकाच्या पोटात असलेल्या बाळाबाबत विचारणा केली असता, त्याचाही मृत्यू झाल्याचे त्याला सांगण्यात आले. यानंतर, दुपारी १२ वाजता मोनिकाच्या मृतदेहाला अंत्यविधीकरता श्मशानभूमीत नेण्यात आले.

राजीवने त्याच्या पत्नी आणि बाळाच्या मृत्यूला वैद्यकीय स्टाफला जबाबदार धरले आहे. राजीव आणि मोनिकाचे लग्न हे अडीच वर्षाआधी झाले होते. राजीव म्हणाला, हे आमचे पहिलेच मूल होते, ज्याला घेऊन आम्ही कितीतरी स्वप्नं रंगवली. मात्र, रुग्णालयाच्या गैरजबाबदारीने माझ्या पत्नीसह बाळाचाही जीव घेतल्याचे राजीवने म्हटले आहे. सध्या राजीव आणि त्याच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे नमुने चाचणीकरता पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details