चेन्नई (तामिळनाडू) - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी द्रमुक आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, केंद्राने तामिळनाडूला दिलेल्या योजना आणि निधी ही मदत नव्हे तर त्या राज्याचा हक्क आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आज चेन्नईमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली.
तेव्हा केंद्रात सत्ता असताना काँग्रेसने काय केले?
केंद्र सरकार तामिळनाडूला देत असलेल्या योजना आणि निधी ही मदत नव्हे तर तामिळनाडूच्या नागरिकांचा तो हक्क आहे, जो त्यांना दिला जात नव्हता. तामिळनाडूला आता त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
हेही वाचा -तृणमूलचे पाच खासदार भाजपमध्ये दाखल होण्यास तयार; भाजप नेत्याचा दावा