कोलकाता - कोरोना विषाणूमुळे पश्चिम बंगाल सरकारने 7, 11 आणि 12 स्पटेंबरला राज्यव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान लॉकडाऊन काळातच नीटच्या परीक्षा 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधून 12 तारखेला लॉकडाऊन निर्बंध उठवावे, अशी मागणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्याकडे केली आहे.
'नीट परीक्षा लक्षात घेता, राज्यातील लॉकडाऊन निर्बंध उठवावे'; एसएफआयची मागणी - लॉकडाऊन
लॉकडाऊन काळातच नीटच्या परीक्षा 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधून 12 तारखेला लॉकडाऊन निर्बंध उठवावे, अशी मागणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्याकडे केली आहे.
कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थी आधीच बऱ्याच अडचणींचा सामना करत आहेत. 13 तारखेला नीट परीक्षा होत असून लॉकडाऊन निर्बंध उठवावे. अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्याना केल्याची माहिती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य समिती अध्यक्ष प्रतिक यांनी सांगितले.
जर प्रशासनाने 12 सप्टेंबरला लॉकडाऊन निर्बंध उठवले नाही, तर किमान त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करावी. जेणेकरून, विद्यार्थी वेळत परिक्षेच्या ठिकाणी पोहचतील, असेही ते म्हणाले. 1 ते 6 स्पटेंबरला पार पडलेल्या जेईई परिक्षेवेळी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात वेळेवर पोहचण्याासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. दरम्यान, देशभरातून नीटसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.