दुर्गापूर - पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगाणा आणि पश्चिम बर्धमान जिल्ह्यात पोलिसांनी सोमवारी कारवाई करताना ७८ बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी यासंबंधी ८ जणांना अटक केली आहे.
पश्चिम बंगालमधील २ जिल्ह्यातून ७८ बॉम्ब जप्त; ८ जणांना अटक - भाटपाडा
बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत वाद पेटलेला आहे. बंगालमध्ये हिंसाचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसांत भाटपाडा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता.
भाटपाडा भागातून ६० बॉम्ब जप्त करण्यात आल्यानंतर उत्तर परगाणा जिल्ह्यातील कांदेश्वर भाकातून दुर्गापूर शहर पोलिसांनी १८ बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. बराकपूरचे पोलीस आयुक्त मनोज कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की भाटपाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गल्ली नंबर ६, काकीनाडा येथून आम्ही ६० बॉम्ब जप्त केले. या प्रकरणात आम्ही ८ जणांना अटक केली असून पुढील तपास चालू आहे. बॉम्बशोधक पथकांनी दुर्गापूर येथे सापडलेले १८ बॉम्ब निष्क्रिय केले आहेत. परंतु, दुर्गापूर येथे सापडलेल्या १८ बॉम्बच्या प्रकरणात अजूनपर्यंत एकालाही अटक झाली नाही.
बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत वाद पेटलेला आहे. यातूनन भाटपाडा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात दोघेजण ठार झाले होते. यासाठी भाजप-तृणमूल एकमेकांना जबाबदार धरत आहेत. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर या भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.