महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये हॉटेलच्या सेप्टीक टँकमध्ये ७ कामगारांचा गुदमरून मृत्यू - seven workers died septic tank

वडोदरा जिल्ह्यातील फारतिकुई गावात ही घटना घडली.

सेफ्टीक टँकमध्ये गुदमरून ७ कामगारांचा मृत्यू

By

Published : Jun 15, 2019, 11:54 AM IST

Updated : Jun 15, 2019, 1:58 PM IST

अहमदाबाद- गुजरातमध्ये एका हॉटेलच्या सेप्टीक टँकची सफाई करताना ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ४ जण सफाई कामगार होते. तर इतर तिघे हॉटेलचे कर्मचारी होते. वडोदरा जिल्ह्यातील फारतिकुई गावात ही घटना घडली.

हॉटेलमधील सेप्टीक टँक साफ करताना या कर्मचाऱ्यांना पुरेसा ऑक्सीजन न मिळाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला, अशी प्राथमिक महिती आहे. यावेळी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या टँकमधून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संबंधीत हॉटेल मालकावर कारवाई करण्यात आली असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदतीची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.

Last Updated : Jun 15, 2019, 1:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details