हैदराबाद - आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात लग्नाचे बिऱ्हाड घेवून जाणाऱ्या व्हॅनला भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण जागीच ठार झाले आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लग्नाचे बिऱ्हाड परत येताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील तांतिकोंडा घाट रोडवरील व्यंकटेश्वरस्वामी मंदिराजवळ ही दुर्घटना घडली.
आंध्र प्रदेशात भीषण अपघात; सात जण ठार - राजमंड्री शासकीय रुग्णालय
सकाळी 3.30 च्या सुमारास लग्नावरुन परत येताना हा अपघात झाला. ब्रेक खराब झाल्याने व्हॅन डोंगरावरून खाली कोसळली. या घटनेत सात जण ठार झाले आहेत. जखमींना राजमंड्री शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
accident in Andhra pradesh.
पहाटे 3.30च्या सुमारास लग्नावरुन परत येताना हा अपघात झाला. ब्रेक खराब झाल्याने ही व्हॅन डोंगरावरून खाली पडली. या अपघातात सात जण ठार झाले असून, जखमींना राजमंड्री शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
Last Updated : Oct 30, 2020, 11:57 AM IST