लखनौ- लग्नसोहळ्याहून परतत असताना पीक-अप व्हॅन इंदिरा कालव्यात कोसळून अपघात झाला. या गाडीत १५ ते १६ जण प्रवास करत होते. त्यापैकी काही जणांना बाहेर काढण्यात आले असून अजून सात ते आठ जण बेपत्ता आहे. उत्तरप्रदेशातील नगराम पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.
इंदिरा कालव्यात वऱ्हाडींची पीक-अप व्हॅन कोसळली, ६ मुलांसह महिला बेपत्ता - accident
अपघातात बेपत्ता असलेल्या मुलांच्या मातांनी हंबरडा फोडला असून त्या कालव्याच्या काठावर मुलांचा शोध लागण्याची आशा धरून बसल्या आहेत.
६ मुलांसह महिला बेपत्ता
लग्नसोहळा उरकून परत येत असलेली ही पीक-अप गाडी इंदिरा कालव्यात पडली. या पीक-अपमध्ये नेमके किती जण होते याची माहिती नसून १५ ते १६ जण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर एनडीआरएफचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहचली. एनडीआरएफच्या जवानांनी घटनेतील काही जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र, काहीजण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्तांमध्ये महिला आणि ६ लहान मुलांचा समावेश आहे.