बंगळुरु - कर्नाटकातील कलबुर्गी येथे कार आणि लॉरीचा भीषण अपघात झाला आहे. यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. इरफान बेगम (25), रुची बेगम (50), आबेधाबी बेगम (50), मुनीर (28), मुहम्मद अली (38), शौकत अली (29), जयचुनाबी (60) अशी मृतांची नावे आहेत. जिल्ह्यातील आलंद येथील ते रहिवासी आहेत.
कर्नाटकातील कलबुर्गी येथे भीषण अपघात; 3 महिलांसह 7 जणांचा मृत्यू - कर्नाटक कलबुर्गी अपघात लेटेस्ट न्यूज
कर्नाटकातील कलबुर्गी येथे कार आणि लॉरीचा भीषण अपघात झाला आहे. यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटक
दरम्यान, आज गुजरातच्या गोध्रामध्ये एका खासगी बसचा अपघात होऊन 35 प्रवासी जखमी झाले. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. यामधील 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना वडोदराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.