महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारमध्ये वीज पडून आठ बालकांचा मृत्यू; नऊ जण जखमी

बिहारमध्ये नवादा जिल्ह्यातील धनापूर गावात वीज कोसळून आठ बालकांचा मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली आहे. यात अन्य नऊ जण जखमी झाले असून जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jul 19, 2019, 8:47 PM IST

Updated : Jul 20, 2019, 6:38 AM IST

बिहार - नवाडा जिल्ह्यातील काशीचक पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या धनपूर गावातील प्रेमानगर परिसरात विज कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ९ जण जखमी झाले आहेत.

अगोदरच पूराच्या थैमानामुळे संकटात असलेल्या बिहारमध्ये या भयानक घटनेनंतर शोक व्यक्त करण्यात येत आहे. विज पडून झालेल्या मृतांमध्ये सात लहान मुले आणि एक युवकाचा समावेश आहे. नऊ जण जखमी झाले असून जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह सध्या शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहेत.

खेळताना घडला अपघात

दुपारनंतर सर्व मुले एका झाडाखाली खेळत होती. तेव्हा आकाशातून मोठा आवाज आला आणि आठ मुले जिथे उपस्थित होते तिथेच विज कोसळली. या घटनेत अन्य नऊ मुले जखमी झाली आहेत. त्यांच्यावर काशीकाकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार उपचार चालू आहेत.

कुटुंबावर शोककळा

या घटनेनंतर गावातील मृतांच्या कुटुंबीयांत मोठ्या प्रमाणात शोक केला जात आहे. या घटनेत मृत असणारे हे सर्व लहान मुलेच असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

Last Updated : Jul 20, 2019, 6:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details