महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कोरोना लसीकरणासाठी भारताला प्राधान्य, लस निर्मितीबाबत पंतप्रधानांशी सखोल चर्चा'

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार पुढील वर्षी जुन जुलैपर्यंत ३० ते ४० कोटी लसींचे डोस तयार करण्याची तयारी सुरु आहे. त्यादृष्टीने लस साठवण, वाहतूक वेगवेगळ्या लसींचे मानवावर होणारे परिणाम यांच्याबाबत पंतप्रधानांशी सखोल चर्चा करण्यात आली, असे अदर पुनावाला म्हणाले.

अदर पुनावाला
अदर पुनावाला

By

Published : Nov 28, 2020, 8:14 PM IST

Updated : Nov 28, 2020, 8:42 PM IST

पुणे - पंतप्रधान मोदींनी आज (शनिवार) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीला भेट देवून कोरोना लस निर्मितीचा आढावा घेतला. त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान मोदींनी लस निर्मितीची सविस्तर माहिती घेतली. कोरोना संकटानंतर लस विकासावर जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होतील याचीही मोदींनी माहिती घेतल्याचे अदर पुनावाला म्हणाले. लस बाजारात कधी येईल त्यासंबंधीच्या नियोजनावरही चर्चा झाली.

अदर पुनावाला पत्रकार परिषद

काय म्हणाले अदर पुनावाला

संपूर्ण जग कोरोना लसीची वाट पाहत आहे. मोठ्या प्रमाणात आणि सर्वांना परवडणाऱ्या दरात लस मिळावी याची सर्वजण लसीवर अवलंबून आहेत. ५० ते ६० टक्के जगातील लसी भारतात तयार होतात, हे सर्वांना माहिती आहे. आत्मनिर्भर भारतचे स्वप्न समोर ठेवत आम्ही पुण्यात महामारीचा सामना करण्यासाठी सर्वात मोठी लस निर्मिती सुविधा उभारली आहे. मोदींनी प्रयोगशाळेची पाहणी करून कोरोना लस निर्मितीची माहिती घेतली, असे अदर पुनावाला म्हणाले.

आरोग्य मंत्रालयाचा निर्णय अखेरचा

अदर पुनावाला यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिले. कोरोना लस आणीबाणीच्या काळात उपयोगात आणण्यासाठी काय तयारी करावी लागेल याबाबत आम्ही पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. लसीसंबंधीची सर्व माहिती आम्ही औषध महानियंत्रकांकडे जमा करत असून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार पुढील वर्षी जुन जुलैपर्यंत ३० ते ४० कोटी लसींचे डोस तयार करण्याची तयारी सुरू आहे. त्यादृष्टीने लस साठवण, वाहतूक वेगवेगळ्या लसींचे मानवावर होणारे परिणाम यांच्याबाबत पंतप्रधानांशी सखोल चर्चा करण्यात आली, असे एका प्रश्नाला उत्तर देताना अदर पुनावाला म्हणाले.

आणीबाणीच्या लस वापराला परवानगी दिली आहे का?

कोविशिल्ड लस आणीबाणीच्या काळात वापरण्याचा परवाना सीरम कंपनीने मागितला आहे का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, अदर पुनावाला म्हणाले, आणीबाणीच्या काळात लस वापराचा परवाना मिळविण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू आहे. नंतर यावर निर्णय घेतला जाईल. सध्या यासंबंधीची कार्यवाही चालू आहे, असे ते म्हणाले.

लस तयार झाल्यास पहिले प्राधान्य भारताला

आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना अदर पुनावाला म्हणाले, लस तयार झाल्यास भारताला प्राधान्य देण्यात येईल. युरोपीयन बाजारात अ‌ॅस्त्राझेनेका कंपनीने तयार केलेली लस वाटण्यात येईल. त्यांना लस निर्मितीच्या कामात आमची गरज लागली तर आम्ही त्यांना कायमच मदत करण्यास तयार आहोत.

Last Updated : Nov 28, 2020, 8:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details