महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कासारगोड येथील गंभीर आजारी रुग्णांना एअरलिफ्ट केले जाणार' - person airlifted to hospitals

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी गंभीर रुग्णांना आवश्यकतेनुसार एअरलिफ्ट करण्यात येईल, असे म्हटले आहे.

पिनराई विजयन
पिनराई विजयन

By

Published : Apr 10, 2020, 12:32 PM IST

तिरुवनंतपुरम- कर्नाटक राज्यातील सिमा बंद असल्याने केरळमधील कासारगोड येथील रुग्णांना मंगळुरुत जाण्यास परवानगी न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी गंभीर रुग्णांना आवश्यकतेनुसार एअरलिफ्ट करण्यात येईल, असे म्हटले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे कर्नाटक राज्य सरकारने त्याचे सीमा रस्ते आणि महामार्ग बंद केले आहेत. ज्यामुळे रुग्णवाहिकांना 20 किलोमिटर अंतरावर असलेल्या मंगळुरुला जाण्याची परवानगी न मिळाल्याने केरळमधील कमीतकमी 9 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर कर्नाटकने केरळमधील रूग्णांना मंगळुरु रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सीमा ओलांडू देण्यास मान्यता दिली होती. मात्र, आज पुन्हा एका व्यक्तीचा उपचार न घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details