नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर भाजपने सत्तास्थापनेसाठी तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमिवर भाजपचे नेते जगदीश शेट्टार, बसवराज बोम्मयी आणि अरविंद लिंबावली हे अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटण्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. ते शाह आणि नड्डा यांच्याशी चर्चा करतील त्यानंतर भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करेल, अशी प्राथमिक माहिती आहे.
कर्नाटक : अमित शाह, जे.पी. नड्डा यांना भेटण्यासाठी भाजप नेते दिल्लीत दाखल - जे.पी. नड्डा
कर्नाटकमध्ये 23 जुलैला काँग्रेस- जेडीएस प्रणित सरकार अवघ्या 14 महिन्यात पडले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेसाठी लगभग सुरू केली आहे. येडियुरप्पा यांनी भाजपचे आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर शुक्रवारपर्यंत भाजप सत्ता स्थापनेचा दावा करेल, अशी प्राथमिक माहिती आहे.
कर्नाटकमध्ये 23 जुलैला काँग्रेस- जेडीएस प्रणित सरकार अवघ्या 14 महिन्यात पडले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेसाठी लगभग सुरू केली आहे. येडियुरप्पा यांनी भाजपचे आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर शुक्रवारपर्यंत भाजप सत्ता स्थापनेचा दावा करेल, अशी सुत्रांनी माहिती दिली आहे.
याच पार्श्वभूमिवर भाजपचे नेते जगदीश शेट्टार, बसवराज बोम्मयी आणि अरविंद लिंब्वली हे अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत सत्ता स्थापनेविषयी चर्चा होईल. त्यानंतर भाजप राज्यपाल वाला यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करेल, असे बोलले जात आहे.