नवी दिल्ली- भाजपच्या जेष्ठ नेत्यांची पक्षात उपेक्षा कायमच आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना आधी पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. त्यानंतर स्टार प्रचारकांच्या यादीतही या जेष्ठांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. सध्याची स्थिती पहाता भाजप नेतृत्वाने या ज्येष्ठांना आत घरीच बसा असा संदेश यातून दिलाय, हे स्पष्ट आहे.
आडवाणी, जोशींच्या नशिबी उपेक्षाच; आधी उमेदवारी नाकारली, आता स्टार प्रचारकांतही नाही नाव - Uma Bharti feature on the list. Names of LK Advani & Murli Manohar Joshi missing from the list 40 star campaigners
भाजपने आज लोकसभा निवडणूकीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात ४० जणांचा समावेश आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा समावेश आहे. शिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अरूण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती हे ही स्टार प्रचारक असणार आहेत. मात्र, जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा यात समावेश नाही.
भाजपने उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूकीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात ४० जणांचा समावेश आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा समावेश आहे. शिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अरूण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती हे ही स्टार प्रचारक असणार आहेत. मात्र, जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा यात समावेश नाही. या आधी पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीतही या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही.