नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना उद्या पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. कायद्यातील सर्व पळवाटा संपल्यामुळे उद्या दोषींना फाशी होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 'चौघांना फाशी देऊ नका, ते देशाची सेवा करण्यास तयार आहेत. त्यांना पाकिस्तान किंवा डोकलाम सीमेवर लढण्यास पाठवा', असे मत दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी व्यक्त केले आहे.
'दोषींना फाशी देऊ नका. ते देशाची सेवा करण्यास तयार आहेत. त्यांना पाकिस्तान, डोकलाम सीमेवर लढण्यास पाठवा. चौघांनाही न्याय मिळाला नाही. देशामध्ये महिला आयोग, महिला हेल्पलाइन क्रमांक आहेत. मात्र, पुरुष आयोग नाहीत. जर पुरुष आयोग असता तर आम्हाला न्याय मिळाला असता, असे ए. पी. सिंह म्हणाले.