महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गिलगिट-बाल्टिस्तान: महिलांना मतदान न करू देण्यावर शेरी रेहमान यांनी व्यक्त केली चिंता - Gilgit-Baltistan Election News

पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सेनेटर शेरी रेहमान यांनी गिलगिट बाल्टिस्तान निवडणुकीत महिलांना मतदान न करू देणे, तसेच निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रांवर कथित गैरप्रकारांवर चिंता व्यक्त केली आहे.

Senator Sherry Rehman worries
सेनेटर शेरी रेहमान

By

Published : Nov 16, 2020, 4:39 AM IST

इस्लामाबाद - पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सेनेटर शेरी रेहमान यांनी गिलगिट बाल्टिस्तान निवडणुकीत महिलांना मतदान न करू देणे, तसेच निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रांवर कथित गैरप्रकारांवर चिंता व्यक्त केल्याची माहिती पाकिस्तानातील एका वृत माध्यमाने दिली आहे.

गिलगिट बाल्टिस्तान येथील निवडणुकीमध्ये महिलांना मतदान करण्यास मज्जाव करणे हे चुकीचे असल्याचे रेहमान म्हणाल्या. तसेच, या प्रकरणात गिलगिट बाल्टिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी रेहमान यांनी केली.

निवडणुकीतील कथित गैरप्रकाराबाबत बोलताना, फ्रि अँड फेअर इलेक्शन नेटवर्क या एनजीओच्या निरीक्षकांना मतदान केंद्रांवरून काढून टाकण्यात आले आहे. निवडणूक आयुक्तांनी या निरीक्षकांना मतमोजनीदरम्यान मतदानकेंद्रात प्रवेश करू द्यावा. मतदान केंद्रात निरीक्षकांची अनुपस्थिती हे निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते, असे मत शेरी रेहमान यांनी व्यक्त केले.

हेही वाचा-मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेनसिंह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details