मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका सध्या अमेरिकेला बसतोय. या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकेचा खूप प्रयत्न सुरू आहे. पण, अद्याप यश मिळत नाही. कोरोना व्हायरसच्या रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) हे औषध दिले जात आहे. भारतात या औषधाच्या निर्यातीवर बंदी होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिल्यानंतर औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. भारतानं 24 औषधं आणि औषध निर्मिती घटकांच्या निर्यातीवर असलेले निर्बंध उठवले आहेत.
त्यानंतर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. पंतप्रधानांसोबतच्या या चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. पंतप्रधानांशी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधानांना जनेतला विश्वास देण्याबात सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली नाही, तर सर्वांना औषधं पुरवणे हे आपले कर्तव्य आहे.