चंदीगड- स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आणि डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम याने पॅरोलसाठी कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला आहे. आपल्याला शेती करायची असल्याचे कारण सांगत त्याने पॅरोल मागितला आहे. त्यांच्या या मागणीवर तुरुंग अधिक्षकांनी सिरसाचे पोलीस आयुक्तांना पत्र लिहुन कायदेशीर बाबींवर सल्ला मागितला आहे. शेती करण्यासाठी गरमीत राम रहिमने ४२ दिवसांची पॅरोल मागीतली आहे.
बाबा राम रहीम यांचा पॅरोलसाठी अर्ज, म्हणाले शेती करायची आहे - guru
दोन महिला साध्वींवरील बलात्कार प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात ते रोहतक येथील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
दोन महिला साध्वीवरील बलात्कार प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात ते रोहतक येथील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तसेच पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी दोषी ठरलेल्या गुरमीत राम रहीम याला विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हत्येनंतर तब्बल १६ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला होता.
राम रहिम यांनी केलेल्या पॅरोलच्या मागणीकडे राजकीय अंगाने देखील पाहिले जात आहे. हरियाना सरकारनेच हे पत्र लिहल्याचे बोलले जात आहे. पुढील तीन चार महिन्यांमध्ये हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राम रहिम यांचे लाखो भक्त आहेत. या भक्तांची मते सत्ताधारी पक्षाला मिळून निवडणुकीत फायदा होईल, असे बोलले जात आहे.