महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरात आज दिवसभरात काय होणार; जाणून घ्या एका क्लिकवर... - farmers protest

देश, जग, खेळ, मनोरंजन आणि राजकारणात काय घडणार, 'ईटीव्ही भारत'वर संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

see-breaking-news-today-across-the-country
देशभरात आज दिवसभरात काय होणार; जाणून घ्या एका क्लिकवर...

By

Published : Dec 19, 2020, 5:36 AM IST

Updated : Dec 19, 2020, 6:18 AM IST

काँग्रेस नेत्यांची आज सोनिया गांधीसोबत बैठक

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आज वरिष्ठ नेत्यासोबत बैठक करणार आहेत. या बैठकीला डॉ. मनमोहन सिंग, ए के. अँटनी, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, भूपेंदर हुडा, कमलनाथ, अशोक गहलोत, पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित राहणार आहेत. विविध विषयावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.

सोनिया गांधी

राष्ट्रपती कोविंद आज पणजीत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज गोव्याच्या 60 व्या मुक्ती दिवस सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण त्यानंतर 14 वर्षं गोव्याचा स्वातंत्र्य लढा सुरू होता. 1498 ला पोर्तुगीज खलाशी 'वास्को द गामा' याने गोव्यात पाऊल टाकले. त्यानंतर गोव्यातून पोर्तुगीज सत्ता संपण्यासाठी 19 डिसेंबर 1961 हा दिवस उजाडावा लागला. आज मोठ्या उत्साहामध्ये गोव्यात मुक्ती दिवस साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. यामुळे पणजीच्या वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला आहे.

रामनाथ कोविंद

पंतप्रधान मोदी आज एसोचैम फाउंडेशनच्या कार्यक्रमाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एसोचैम (ASSOCHAM) फाउंडेशन वीक कार्यक्रमात संबोधन करणार आहेत. या कार्यमात देशभरातील प्रमुख उद्योगपती सहभागी होणार आहेत. मोदींसह कृषी मंत्री नरेंद्र तोमर आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल देखील आपले विचार व्यक्त करणार आहेत. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारा होणार आहे.

नरेंद्र मोदी

गृहमंत्री अमित शाह बंगाल दौऱ्यावर

कोलकाता - गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. काल (शुक्रवार ता. १८) उशिरा रात्री ते कोलकातामध्ये दाखल झाले. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीची तयारी भाजपाने आतापासूनच सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह बंगाल दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते रॅली आणि रोड शो करत कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

अमित शाह

कृषी आंदोलनाचा २४ वा दिवस

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे पारित केले आहेत. हे कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी पंजाब हरियाणा या राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आजचा या आंदोलनाचा २४ वा दिवस आहे. अनेकदा शेतकरी आणि सरकार यांच्यात या विषयावरून चर्चा झाली आहे. पण यातून अद्याप तोडगा निघालेला नाही. दिवसागणिक हे आंदोलन चिघळत चालले आहे. सर्वोच्च न्यायालयात या विषयावरून एक याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने हे तीन कायदे स्थगित ठेवता येतील का?, याचीही शक्यता पडताळून पहावी, असे केंद्र सरकारला सूचवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आंदोलनात शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत.

शेतकरी आंदोलन

संजय राऊतांचा पत्रकारांशी वार्तालाप

संजय राऊत आज पत्रकारांशी वार्तालाप करणार आहेत. यात ते भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविषयी भाष्य करण्याची शक्यता जास्त आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी आमदार गोपीचंद यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला पडळकरांनी एका पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले होते.

संजय राऊत

बाबरी मशिदच्या बांधकामाची आज येणार ब्लू प्रिंट

नविन बांधण्यात येणाऱ्या बाबरी मशिदचे ब्लू प्रिंट आज सादर केले जाणार आहे. या मशिदीच्या बांधकामाला प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारीपासून केलं जाणार आहे. पाच एकर परिसरात मशिदीसह ग्रंथालय तसेच स्वयपाक घर तयार केलं जाणार आहे. मशिदमध्ये एका वेळेस २ हजार लोक नमाज अदा करू शकतील, अशी रचना केली जाणार आहे. दरम्यान, मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याच्या विवाधित जागेबाबत निकाल दिला. यात त्यांनी सुन्नी वफ्फ बोर्डाला मशिद बांधण्यासाठी ५ एकर जागा देण्याचे आदेश दिले होते.

बाबरी मशिदच्या बांधकामाची आज येणार ब्लू प्रिंट

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा आज तिसरा दिवस

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. अ‌ॅडिलेड येथे खेळवण्यात येणारा हा सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४४ धावा केल्या. यानंतर रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९१ धावांवर रोखलं आणि पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने एक गड्याच्या मोबदल्यात ९ धावा केल्या आहेत. नाइट वॉचमन म्हणून आलेला बुमराह (०) आणि सलामी फलंदाज मयांक अगरवाल (५) नाबाद आहेत.

भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी सामना

माही गिलचा आज वाढदिवस

बॉलीवूड अभिनेत्री माही गिलचा आज वाढदिवस. तिने 'खोया खोया चांद' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९ डिसेंबर १९७५ मध्ये चंदीगढ येथे तिचा जन्म झाला. दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या 'देव डी' सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली. माहीने वयाच्या १७ व्या वर्षी लग्न केले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही.

माही गिल

अंकिता लोखंडेचा वाढदिवस

पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा आज वाढदिवस आहे. अंकिताने कंगणा रणौतने साकरलेल्या मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाशी या चित्रपटात झलकारी बाईचे ऐतिहासिक पात्र साकारले आहे.

अंकिता लोखंडे
Last Updated : Dec 19, 2020, 6:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details