- पंतप्रधान मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष यांच्यात आज व्हर्चुअल बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झीयोयेव शुक्रवारी डिजिटल माध्यमातून एक बैठक घेणार आहेत. दरम्यान हे दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करतील. तसेच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर मत व्यक्त करतील. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली.
- पश्चिम बंगाल: राज्यपाल जगदीप धनखर आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतील
कोलकाता- पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, राज्य सरकार त्यांच्या इशाऱ्यानंतरही कारवाई करण्यात अपयशी ठरले. दरम्यान, आज राज्यपाल जगदीप धनकर आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतील. यामध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'अंतरराष्ट्रीय भारती महोत्सव-2020' ला संबोधित करतील
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 04:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 ला संबोधित करतील. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, महाकवी सुब्रमण्य भारती यांची 138 वी जयंती साजरी करण्यासाठी वनवासी सांस्कृतिक केंद्रातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
- दुमका ट्रेझरी प्रकरणात आज लालू यादव यांच्या जामीन अर्जावर सुनावणी
चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर आरजेडी सुप्रीमो लालू यादव सध्या तुरूंगात आहेत. शुक्रवारी झारखंड उच्च न्यायालयात त्याच्या वतीने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. जर त्यांना आज होईकोर्टच्या वतीने जामीन मिळाला तर त्यांच्या तुरूंगातून सुटण्याचा मार्ग मोकळा होईल कारण चारा घोटाळ्याच्या बहुतांश घटनांमध्ये त्यांना आधीच जामीन मिळाला आहे.
- आज शेतकरी आंदोलनाचा 16 वा दिवस
कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 16 वा दिवस आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात संघर्ष वाढत आहे. कृषी कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकरी नेते म्हणाले.
- आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची ईडीकडून चौकशीची शक्यता
मनी लाँडरिंग संदर्भात चौकशी करत असलेल्या ईडीकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांच्या चौकशीची शक्यता आहे. यापुर्वी त्यांना ४ वेळा समन्स पाठवण्यात आल्यानंतरही ते चौकाशीसाठी हजर झाले नव्हते.