महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चित्रपटगृहावर पोस्टर लावत असताना सुरक्षा रक्षकाचा मृत्यू - चित्रपटगृहे बंद

चित्रपटगृहात पोस्टर लावण्याचे काम सुरक्षा रक्षकाचे नसल्याचे मालकाने सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे बंगळुरू शहराच्या पश्चिम विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 6, 2020, 3:28 PM IST

बंगळुरू - चित्रपटगृहात सुरक्षा रक्षकाचे काम करत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर लावत असताना उंचावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. बंगळुरू शहरात आज ( रविवार) ही घटना घडली.

चित्रपटगृहात पोस्टर लावण्याचे काम सुरक्षा रक्षकाचे नसल्याचे मालकाने सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे बंगळुरू शहराच्या पश्चिम विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी सांगितले. सकाळी सव्वाआठच्या दरम्यान ही घटना घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीने सुरक्षा रक्षकाचे कपडे घातलेले होते. त्याचा पोस्टर लावण्याशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे हा घातपाताचा कट तर नाही ना, ह्या बाजूनेही पोलीस तपास करत आहेत.

१५ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना नियमावलीचे पालन करत तसेच ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे आता सुरू आहेत. चित्रपटगृहांबाबत अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्राने राज्यांवर सोपवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details