महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

घातपात टळला...नक्षलवाद्यांनी पुरलेला 4 किलोचा आयईडी बॉम्ब निकामी - आयईडी स्फोट छत्तीसगड

'डिस्ट्रिक रिजर्व्ह गार्ड' (DRG) पथकाकडून जिल्ह्यातील पांचाली गावात ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी याबाबत माहिती दिली.

आयईडी बॉम्ब निकामी
आयईडी बॉम्ब निकामी

By

Published : Jul 5, 2020, 7:35 PM IST

रायपूर -छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला आयईडी बॉम्ब सापडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तब्बल 4 किलोचा आयईडी बॉम्ब सुरक्षा दलांनी निकामी केला आहे. शोधमोहिम राबवली असता घातपात घडवण्याच्या मोठ्या योजनेचा फर्दाफाश करण्यात आला.

डिस्ट्रिक रिजर्व्ह गार्ड (DRG) पथकाकडून जिल्ह्यातील पांचाली गावात ही कारवाई करण्यात आली, जिल्हा पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी याबाबत माहिती दिली. एका स्टीलच्या डब्यात बॉम्ब जमीनीखाली पुरुन ठेवण्यात आला होता. या बॉम्बला निकामी करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधली कानकेर जिल्ह्यातील रावस जंगलात 5 किलोचा आईडी बॉम्बही सुरक्षा दलांनी जप्त केला होता. तर मागील महिन्यात नारायणपूर जिल्ह्यात आयईडी स्फोटात छत्तीसगड आर्मड फोर्सेस दलाचा एक जवान जखमी झाला होता. घनदाट जंगलातून सुरक्षा दलांचा ताफा जात असताना नक्षलवादी रस्त्यावर स्फोटके पुरतात. त्यामुळे जवानांना सतत सतर्क रहावे लागते.

दरम्यान, आज(रविवार) काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आयई़डी स्फोटात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला. सीआरपीएफचा ताफा जात असताना हा स्फोट झाला. जिल्ह्यातील गनो गावामध्ये ही घटना घडली. कमी क्षमतेचे स्फोटक असल्याने जास्त हानी झाली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details