श्रीनगर -दोन विविध ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईत लष्कराला यश आले असून यामध्ये आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. दक्षिण काश्मिरच्या शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात ही चकमक झाली आहे.
गुरुपासून सुरू झालेल्या दोन्ही ऑपरेशन्सला आज आणखी यश मिळाले. रात्री काही काळ ऑपरेशन थांबवण्यात आले होते. मात्र आज पहाटे पुन्हा सुरुवात झाली. यामध्ये पुलवामात जैश ए महम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर शोपियन प्रांतात जैश आणि हिजबूल मुजाहिदिनच्या एकूण पाच जणांचा खात्मा करण्यात आलाय.
दरम्यान गुरुवारी पुलवामातील पाम्पोर येथे मीज परिसरात सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी काही दहशतवाद्यांनी सुरक्षासक्षकांवर हल्ला चढवल्याने त्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांनी शोध पथकावर गोळीबार केल्याने या ठिकाणी चकमक सुरू झाल्याची माहिती अधिकऱ्यांनी दिली.