पुलवामा ( जम्मू काश्मीर) - जिल्ह्यातील लस्सीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. हे चारही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे असून चकमकीत सुरक्षा दलाच्या ३ जवानांसह एक पोलीस जखमी झाला आहे.
जम्मू-काश्मीर : पुलवामामधील चकमकीत 'लष्कर'च्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान जखमी - encounter
भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
पुलवामा येथील लस्सीपूरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने सोमवारी पहाटेपासून परिसरात शोधमोहीम सुरु केली. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. तेव्हा सुरक्षा दलांनी या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त केला आहे. चकमकीत जखमी झालेल्या जवान आणि पोलीस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवादी संघटनाच्या विरोधात कडक पाऊल उचलले आहे. सुरक्षा दलाने मागील ३ महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊट सुरू केले आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून ६० हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.