श्रीनगर- रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत अखेर सुरक्षा दलाने दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. हा दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरे भागात मारला गेला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील सोपोरे भागात सुरक्षा दलाकडून दहशतवाद्याला कंठस्नान - सोपोरे
सोपोरे भागात दहशतवादी असल्याची सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी शोधमोहिम सुरू केली होती.
सोपोरे भागात दहशतवादी असल्याची सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी शोधमोहिम सुरू केली होती. दहशतवाद्याने पळून जावू नये, यासाठी सुरक्षा दलाने परिसरातील वेढाही वाढविला होता. त्याचा परिणाम म्हणून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाबरोबर चकमक सुरू केली. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले, चकमकीत अज्ञात दहशतवादी ठार करण्यात आला आहे. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. त्याची ओळख आणि तो कोणत्या संघटनेशी दहशतवादी संबंधित होता, याची माहिती घेतली जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.