महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; दोघांची ओळख पटली..

आज मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून; शाकूर फारूख लांगू, शाहिद अहमद भट असे यातील दोघांची नावे आहेत. तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हे सर्व दहशतवादी एचएम/आयएसजेके या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Security forces eliminate terrorist in Jammu and Kashmir's Shopian; operation underway
जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; दोघांची ओळख पटली..

By

Published : Jun 21, 2020, 9:24 PM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या झाडिबलमध्ये पोलीस, सीआरपीएफ आणि क्यूएटी दलाने केलेल्या संयुक्त कामगिरीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच काश्मीरच्या विविध भागामध्ये दशतवाद्यांचा शोध घेणे सुरू होते.

आज मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून; शाकूर फारूख लांगू, शाहिद अहमद भट असे यातील दोघांची नावे आहेत. तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हे सर्व दहशतवादी एचएम/आयएसजेके या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे सर्व दहशतवादी स्थानिक होते. त्यामुळे आम्ही काही लोकांमार्फत त्यांना शरण येण्याचे आवाहनही केले होते. मात्र, त्यांनी ते न ऐकता आमच्या दिशेने ग्रेनेड फेकले. त्यानंतर झालेल्या चकमकीमध्ये हे तीनही दहशतवादी मारले गेले, अशी माहिती काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.

दरम्यान, जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांनी लॉकडाऊनच्या काळात तब्बल 68 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर यावर्षीच्या जूनपर्यंत एकूण 100 दहशतवादी ठार केले आहेत. यामध्ये काही परदेशी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. 1 एप्रिल ते 10 जून या काळात झालेल्या विविध चकमकींमध्ये दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. इतर सर्वजण कोरोनाचा सामना करत असताना सुरक्षा दले मात्र काश्मिरात दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात गुंतली आहेत.

हेही वाचा :चीनने भारताची जमीन बळकावली; राहुल गांधींनी दिला पुरावा..

ABOUT THE AUTHOR

...view details