महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'लॉकडाऊन काळात काश्मिरात 68 दहशतवाद्यांचा खात्मा' - दहशतवादी संघटना

सुरक्षा दलांनी जमा केलेल्या आकडेवारीनुसार हिजबुल मुजाहिदीनने यावर्षी सर्वात जास्त हल्ले करण्याचा करण्याच प्रयत्न केला. या संघटनेचे 35 दहशतवादी सुरक्षा दलांनी ठार मारले.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jun 11, 2020, 8:09 PM IST

नवी दिल्ली -जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांनी लॉकडाऊन काळात तब्बल 68 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर जूनपर्यंत 100 दहशतवादी ठार केले आहेत. यामध्ये काही परदेशी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. 1 एप्रिल ते 10 जून या काळात झालेल्या विविध चकमकीमध्ये दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. इतर सर्वजण कोरोनाचा सामना करत असताना सुरक्षा दले काश्मीरात दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात गुंतले होते.

सुरक्षा दलांनी जमा केलेल्या आकडेवारीनुसार हिजबुल मुजाहिदीनने यावर्षी सर्वात जास्त हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या संघटनेचे 35 दहशतवादी सुरक्षादलांनी ठार मारले. 10 जूनपर्यंत ठार केलेल्या 16 दहशतवाद्यांची अजून ओळखही पटली नाही. यामध्ये 10 परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी 23 मार्चला पहिल्यांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आले. जानेवारी महिन्यापासून ते 10 जूनपर्यंत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना संपविण्यात आले आहे. यामध्ये लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहीदीन आणि जैश ए मोहम्मद या संघटनांच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.

एप्रिल महिन्यात सुरक्षा दलांनी सर्वात जास्त कारवाया केल्या. फक्त एप्रिल महिन्यात 28 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. तर मे महिन्यात 15 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. केंद्रिय राखीव पोलीस दल, जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराने या कारवाईत सहभाग घेतला होता. मागील वर्षी जून महिन्यापर्यंत 125 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details