बंगरुळू -सोमवारी कर्नाटकातील काँग्रस आणि जेडीएस यांच्या युतीचे सरकार विश्वास प्रस्तावाच्या चाचणीला सामोरे जाणार आहे. यासाठी विधान भवन परिसरतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासाठी विधान भवन परिसर आणि राज भवन रोडवर पुरेशी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे.
रविवारी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आपआपल्या आमदारांच्या बैठका घेतल्या. सोबतच विश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने भाजपने सांसदीय बैठक बोलावली आहे. बंगरुळातील रामदा हॉटेल येथे थांबलेले भाजपच्या आमदारांना येथे योगा करतांना पाहण्यात आले आहे.
कर्नाटकातील बंडखोर आमदारांना विश्वासात घेत मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी म्हणाले, संसद भवानातील सत्राला उपस्थीत राहून सर्वांना सांगा की, भाजप पक्ष कसा आहे. आणि त्याने लोकशाहीच्या इमारतीला पोखरत तिचे पावित्र कसे नष्ट केले.
सोमवारी कर्नाटक विधान भवनात विश्वासप्रस्तावाची चाचणी होणार आहे. यावेळी विधान भवनात होणाऱ्या कामकाजाकडे सगळ्याचे लक्ष लागलेले आहे. भाजपने केलेल्या अनेक आरोप प्रत्यारोपानंतर सभापती के आर रमेश कुमार विश्वास प्रस्तावाच्यावेळी काय पावले उचलतात हे पाहण्यासारखे असेल.