महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लडाखमधील चीनच्या घुसखोरीबाबत सुरक्षा यंत्रणांनी केला सरकारला अहवाल सादर - चीन लडाख सीमा बांधकाम अहवाल

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ५ हजारांपेक्षा जास्त सैन्य आणून ठेवले आहे. सुरुवातीला चिनी सैन्याच्या हालचालींनी भारतीय सैन्य चिंतेत पडले होते मात्र, भारतानेही काही राखीव सैन्य या भागात तैनात केले. कारू येथे मे च्या पहिल्या आठवड्यापासून काही ठिकाणी भारतीय हद्दीत चिनी सैन्य बसले आहे. त्यांच्यावर सैन्याची बारीक नजर असून चिनी सैन्याने अद्याप काही हालचाल केलेली नाही. .

Security agencies
सुरक्षा संस्था

By

Published : Jun 4, 2020, 5:38 PM IST

नवी दिल्ली - पूर्वी लडाखमध्ये चिनी सैन्याने पुन्हा बांधकाम केले असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सैन्य आणले गेले आहे. याबद्दलचा एक सविस्तर अहवाल भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सरकारला सादर केला आहे. लडाखमधील दौलत बेग ओल्डि सेक्टर आणि पांगोंग त्सो क्षेत्रासह इतर ठिकाणी चिनी सैनिकांनी केलेल्या बांधकामाची माहिती या अहवालात नमूद केलेली आहे.

या भागात चिनी सैनिकांनी अतिशय सहज बांधकाम करून मोठ्या प्रमाणात सैन्य कसे आणले असेल, याबाबतच्या सर्व शक्यता सुरक्षा यंत्रणांनी पडताळून पाहिल्या आहेत. त्यानंतरच हा सविस्तर अहवाल सरकारला सादर करण्यात आला.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ५ हजारांपेक्षा जास्त सैन्य आणून ठेवले आहे. सुरुवातीला चिनी सैन्याच्या हालचालींनी भारतीय सैन्य चिंतेत पडले होते मात्र, भारतानेही काही राखीव सैन्य या भागात तैनात केले. कारू येथे मे च्या पहिल्या आठवड्यापासून काही ठिकाणी भारतीय हद्दीत चिनी सैन्य बसले आहे. त्यांच्यावर सैन्याची बारीक नजर असून चिनी सैन्याने अद्याप काही हालचाल केलेली नाही.

चिनी सैन्याने सुरुवातीला भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र, भारताने वेळेवर आपले सैन्य तैनात केल्याने चीनला माघार घ्यावी लागली, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

भारत आणि चीन दरम्यान येत्या शनिवारी लेफ्टनंट जनरलची चर्चा नियोजित केली आहे. भारताच्या सीमांचे अखंडत्व कायम राखण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. उभय देशांदरम्यान आत्तापर्यंत सीमांबाबत चार वेळा करार झाले आहेत. त्यापैकी दोन 1993 आणि 1996 मधील आहेत तर नंतरचे दोन 2005 आणि 2013 मधील आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details