महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कृषी आंदोलन : फरीदाबाद ते दिल्लीकडे जाणार्‍या सर्व सीमारेषांवर कलम 144 लागू

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटना दिल्लीकडे कूच करत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी फरीदाबाद ते दिल्लीकडे जाणार्‍या सर्व सीमारेषांवर कलम 144 लागू केले आहे.

कृषी आंदोलन
कृषी आंदोलन

By

Published : Nov 26, 2020, 3:00 PM IST

फरीदाबाद - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरयाणाच्या फरीदाबाद पोलिसांनी पूर्णपणे बंदोबस्त केला. फरीदाबाद ते दिल्लीकडे जाणार्‍या सर्व सीमारेषांवर कलम 144 लागू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी लाऊडस्पीकरवरून त्यांना परत फिरण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिल्लीकडे जाणाऱ्सया सर्व वाहनांवर बारिक नजर ठेवली आहे. शेतकऱ्यांनी सीमा ओलांडू नये, हा पोलिसांचा प्रयत्न आहे. दिल्लीकडे जाणाऱया मार्गावर फरीदाबाद पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत, त्यामुळे वाहनांचा वेग कमी झाला आहे. दिल्लीला जाणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही, असे फरीदाबाद पोलिसांनी म्हटले आहे. फरीदाबादमधील बदरपूर बॉर्डर, सराय आणि बायपास रोड सेक्टर 37वर कलम 144 लागू केले आहे.

फरीदाबादमधील बदरपुर बॉर्डर, सराय आणि बायपास रोड सेक्टर 37 वर कलम 144 लागू

शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा -

कृषी कायद्याविरोधातील आंदोलन तीव्र झाले आहे. दिल्ली-जम्मू महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिसांना तैनात केले आहे. तसेच परिस्थितीवर नियत्रंण मिळवण्यासाठी पोलीस ड्रोनचाही वापर करत आहेत. पंजाब-हरयाणा सीमेवर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली पाहायला मिळाली. अंबालामध्ये आंदोलनासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. शेतकऱ्यांना दिल्लीस जाण्यापासून पोलीस अडवत आहेत. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा -आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत राहणार बंदच; डीजीसीएचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details