नवी दिल्ली -चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी चीनमध्ये गेलेले एअर इंडियाचे दुसरे विशेष विमान आज सकाळी दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. चीनहून ३२३ भारतीयांसह मालदीवच्या 7 नागरिकांना घेऊन विमान सव्वा नऊ वाजता दिल्लीत पोहचले आहे.
यापूर्वी एअर इंडियाच्या पहिल्या विशेष विमानाने चीनवरून ३२४ भारतीयांना आणले होते. यातील काही नागरिकांना भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या छावला कॅम्पमध्ये तर इतरांना हरियाणाच्या मानेसरमधील सैन्य शिबिरामध्ये दाखल करण्यात आले आहे. या भारतीयांमध्ये ३ अल्पवयीन आणि २११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुढील १४ दिवस त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा -विश्व हिंदू महासभेच्या उत्तर प्रदेश अध्यक्षांची गोळी घालून हत्या