पाटणा (बिहार) - राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि जेडीयूमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाला आहे. यानुसार जेडीयू 122 तर भाजपा 121 जागा लढवणार आहेत.
बिहार महासंग्राम : एनडीएचे जागावाटप निश्चित; जेडीयू 122 तर भाजपा 121 जागा लढविणार
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि जेडीयूमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार
पाटण्यात जनता दल (संयुक्त) आणि भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज (मंगळवारी) संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत घोषणा करण्यात आली. यानुसार जेडीयू 122, भाजपा 121 लढवणार आहे. तर जेडीयू आपल्या वाट्याला आलेल्या जागांपैकी 7 जागा जीतनराम मांझी यांना देणार आहे. तर भाजपा आपल्या वाट्याला आलेल्या जागांपैकी विकासशील इंसान पक्षाला जागा देणार आहेत.
- पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे -
- मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले
- भाजपा 121 जागा लढवणार
- जेडीयू 122 जागा लढवणार, यातील 7 जागा हिंदुस्तानी आवाम मोर्चाला (हम पक्ष) दिल्या जाणार
- भाजपाचे जेडीयू सोबत अतूट युती - संजय जयस्वाल
- 'नितीशच आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, यात कोणतीच शंका नाही'
- 'लोकजनशक्ती पक्ष आमचा सहयोगी आहे, पासवान यांचा आम्ही सम्मान करतो'
- एनडीएत तोच राहील जो नितीश यांच्या नेतृत्वाला स्वीकार करेल
- विकासशील पक्षाला भाजपा आपल्या कोट्यातील जागा देणार
- एनडीए सोबत युतीला घेऊन आधीच चर्चा झाली होती - मुख्यमंत्री नितीशकुमार
- एनडीए उमेदवारांची नावे निश्चित - मुख्यमंत्री नितीशकुमार
Last Updated : Oct 6, 2020, 6:15 PM IST