लखनऊ(उत्तर प्रदेश) - तबलिगी जमातनंतर रोहिंग्यांकडून कोरोनाचा धोका वाढेल, अशी चिन्हे दिसत आहेत. केंद्र सरकारने योगी सरकारला आठ जिल्ह्यात रोहिंग्या मुस्लिम असण्याची शक्यता उपस्थित केली असून त्यांची माहिती मागवली आहे. केंद्राच्या आदेशानंतर योगी सरकारने यासंबंधित कारवाई सुरू केली आहे. शासनाने आठ जिल्ह्यात या लोकांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेशात आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये जवळपास ५८ टक्के लोक हे या जमातीशी जुळलेले होते. अशात आता रोहिंग्या मुसलमानांना उत्तर प्रदेश येथे येण्याची सूचना सरकारला मिळाली आहे. केंद्र सरकारने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडून आठ जिल्ह्यांची माहिती मागितली आहे. यामध्ये नोएडा, मुजफ्फरनगर, सहारनपुर, मेरठ, अलीगढ़, फिरोजाबाद, मथुरा आणि कानपूर या शहराचा समावेश आहे. केंद्राद्वारे रोहिंग्या मुसलमान येण्यापूर्वी या जिल्ह्यांची माहिती मागवण्यात आली आहे.