महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरातमधील सी-प्लेन सेवा होणार पुन्हा सुरू

गुजरातमधील सी-प्लेन सेवा सध्या बंद ठेवण्यात आली आहे. विमाने दुरूस्तीसाठी मालदीवला पाठवल्याने ही सेवा बंद आहे. २७ डिसेंबरपासून ही विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे.

Seaplane
सी-प्लेन

By

Published : Dec 20, 2020, 11:08 AM IST

अहमदाबाद - केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सागरी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट ते गुजरातच्या केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंतची सी-प्लेन सेवा देखभालीसाठी तीन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. ही सेवा येत्या २७ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे, अशी माहिती गुजरात हवाई वाहतूक संस्थेचे संचालक कॅप्टन अजय चौहाण यांनी दिली.

गुजरातमधील सी-प्लेन सेवा २७ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे

31 ऑक्टोबर रोजी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सी-प्लेनचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील विमान दुरुस्ती केंद्र अद्याप निर्माणाधीन असल्याने ही विमाने मालदीव येथे दुरूस्ती करता पाठवण्यात आली होती.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते उद्घाटन -

31 ऑक्टोबर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सी-प्लेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मोदींनी सरदार सरोवर धरणाजवळील तलाव-3 येथून विमान प्रवास करत सेवेचे उद्घाटन केले होते. उद्घाटनापूर्वी मोदींनी या सेवेचा तपशीलही घेतला होता.

ही आहे सी-प्लेनची वैशिष्ट्ये -

सी-प्लेन हे अहमदाबाद ते केवडिया हे 200 किमीचे अंतर केवळ 40 मिनिटांत पार करू शकते. या सी-प्लेन मध्ये 19 जणांना बसण्याची सुविधा असून हे सी-प्लेन 300 मीटरच्या धावपट्टीवर उड्डाण घेण्यास सक्षम आहे. या सी-प्लेनची दररोज अहमदाबाद ते केवडिया या मार्गावर 8 उड्डाणे होत असून प्रवास करण्यासाठी एका प्रवाशाला 4 हजार 800 रुपयांचे तिकीट काढावे लागते. हे सी-प्लेन चालवण्यासाठी विदेशी तज्ज्ञांकडून भारतीय वैमानिकांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details