महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिच्या मुलाने 'नीट' परीक्षा केली 'क्रॅक' - युपी भंगार व्यावसायिक मुलगा नीट परीक्षा यश

काही मुले आपल्या आई-वडिलांचे कष्ट जाणून जिद्दीने अभ्यास करतात व यश मिळवतात. उत्तर प्रदेशच्या कुशीनगरचा रहिवासी असणाऱ्या एका मुलाने नीट परीक्षेत यश संपादन केले आहे. आपल्या वडिलांसाठी त्याने हे यश मिळवले.

NEET
नीट

By

Published : Oct 25, 2020, 4:25 PM IST

जयपूर - गेल्या आठवड्यात नीट(वैद्यकीय प्रवेशाची पात्रता परीक्षा)चा निकाल लागला. यात अनेकांची स्वप्ने सत्यात उतरली तर काहींच्या पदरी निराशा पडली. पात्र विद्यार्थ्यांमध्ये एक असा मुलगा आहे, ज्याच्यासाठी ही फक्त स्वप्नांची परीक्षा नव्हती तर वडिलांच्या सन्मानाचीही होती. यामुलाने नीटमध्ये यश मिळवत आपल्या वडिलांच्या नावाचा आणि व्यवसायाचा अपमान करणाऱ्यांना जोरदार चपराक दिली आहे.

अरविंद कुमार असे या २६ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात राहतो. त्याच्या वडिलांचे नाव 'भिकारी' असून भंगारचा व्यवसाय करतात. त्यांच्या नावामुळे आणि व्यवसायामुळे त्यांना अपमानाचा सामना करावा लागतो. आपण डॉक्टर होऊन आपल्या वडिलांना सन्मान मिळवून देण्याचा निश्चय अरविंदने केला. त्याने सर्वप्रथम २०११मध्ये वैद्यकिय प्रवेश पात्रता परीक्षा (त्यावेळची एआयपीएमटी) दिली होती. मात्र, त्याला अपयश आले. यावर्षीचा त्याचा नववा प्रयत्न होता. त्याचा देशात ११ हजार ६०३ रँक मिळाली असून ओबीसी प्रवर्गात त्याला ४ हजार ३९२वी रँक मिळाली आहे.

सतत आठवेळा अपयश आले मात्र, मी जिद्द सोडली नाही. मी नकारत्मकतेला सकारात्मकतेमध्ये परावर्तीत करायला शिकलो आहे. त्यातूनच मला प्रेरणा मिळत गेली. कुटुंबाचा पाठिंबा, स्वत:ची जिद्द यामुळेच हे यश मिळाल्याचे अरविंद सांगतो. अरविंदचे वडील पाचवी पर्यंत शिकले आहेत तर आई ललिता देवी अशिक्षित आहे.

काही वर्षांपूर्वी मुलांच्या शिक्षणासाठी अरविंदचे वडिल कुशीनगरमध्ये वास्तव्यास आले. तिथेच त्याने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याला दहावीत ४८.६ टक्के गुण मिळाले होते. सायन्स शाखेत त्याने बारावीला ६० टक्के गुण मिळवले. तेव्हाच त्याने डॉक्टर होण्याचा निश्चय केला होता. त्यासाठी त्याने न थकता सतत नऊ वर्षे प्रयत्न केले.

आपले परीक्षा देण्याचे वय निघून जाईल या भीतीने अरविंदने २०१८ला राजस्थानातील कोटा गाठले. तेथे त्याने खासगी शिकवणीमध्ये प्रवेश घेतला. त्याच्या शिकवणीचे शुल्क भरण्यासाठी वडिलांनी १२ ते १५ तास काम केले. मी कष्ट केले मात्र, माझ्या मुलाने कष्टाचे चीज केले, अशी भावना अरविंदच्या वडिलांनी व्यक्त केली.

माझ्या कुटुंबाला माझा अभिमान वाटतो आहे. माझ्या गावातील मी पहिलाच डॉक्टर असेल. मात्र, अजूनही गावातील लोक माझ्या कुटुंबाला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आहेत, जेणे करून मला भविष्यात सरकारी नोकरी मिळणार नाही, असे अरविंदने सांगितले.

अरविंदला अपेक्षा आहे की, गोरखपूरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळेल. त्याला भविष्यात अस्थिरोग तज्ञ होण्याची इच्छा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details