नवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यातील शाळा आणि महाविद्यालये १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. जम्मू काश्मीरबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर शाळा आणि महाविद्यालये अनिर्णित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.
काश्मीर खोऱ्यातील शाळा महाविद्यालये १९ ऑगस्टपासून सुरू होणार - कलम ३७०
काश्मीर खोऱ्यातील शाळा आणि महाविद्यालये १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

काश्मीर
आता १९ तारखेपासून शाळा महाविद्यालये पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती येत आहे. संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हळूहळू काश्मीर पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या असून काही संवेदनशिल ठिकाणी अजूनही कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे.
सरकारी कार्यालये आणि श्रीनगर येथील सचिवालयाचे कामकाज आजपासून चालू करण्याचे निर्देश राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले आहेत. याबाबतचे वृत्त ऑल इंडिया रेडिओने दिले आहे