नवी दिल्ली - निर्भया हत्याकांडातील अक्षय कुमार सिंह या गुन्हेगाराने सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १७ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.
निर्भया हत्याकांड: सर्वोच्च न्यायालय 17 डिसेंबरला पुनर्याचिकेवर देणार निर्णय - निर्भया खटला
निर्भया हत्याकांडातील एका गुन्हेगाराच्या पुनर्याचिकेवर सर्वोच्च न्यायालय १७ डिसेंबरला निर्णय देणार आहे. अक्षय कुमार सिंग (३३) या गुन्हेगाराने सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल केली होती.
संग्रहित छायाचित्र
हेही वाचा -Breaking News : अयोध्या निकालाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
अक्षय कुमार सिंह (३३) याने इतर तीन आरोपींसोबत पुनर्याचिका दाखल केली नव्हती. मात्र, नंतर वकील ए. पी. सिंह यांच्याद्वारे पुनर्याचिका दाखल केली. अक्षय सिंह याच्या वकिलांनी मंगळवारी फाशीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला होता.