नवी दिल्ली - बाबरी प्रकरणाची अंतिम सुनावणी ३१ ऑगस्टच्या आतच पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बाबरी मशीद पाडण्याप्रकरणी सीबीआयच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
३१ ऑगस्टच्या आत लागणार 'बाबरी'चा निकाल!
बाबरी प्रकरणाची अंतिम सुनावणी ३१ ऑगस्टच्या आतच पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बाबरी मशीद पाडण्याप्रकरणी सीबीआयच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
३१ ऑगस्टच्या आत लागणार 'बाबरी'चा निकाल!
बाबरी प्रकरणी सीबीआयने आपली तपासणी पूर्ण झाल्यानंतर ४९ दोषींविरोधात चार्जशीट दाखल केली होती. यांपैकी १७ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री एल. के. अडवाणी आणि भारतीय जनता पक्षामधील एम एम जोशी, उमा भारती आणि विनय कटियार अशा वरिष्ठ नेत्यांचाही समावेश आहे.
यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद ट्रायल कोर्टाचे न्यायाधीश एस. के. यादव यांचा कार्यकाळ 31 ऑगस्टपर्यंत वाढविला आहे.